दिंडोरी लोकसभा मतदार संघातील रस्ते चकाचक होणार

११६.५३ किमी रस्त्यांसाठी ७३१९.९२ लाखांचा निधी मंजूर
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील रस्ते चकाचक होणार

नाशिक । Nashik

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या (Dindori Loksabha Assembly) खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Minister Bharti Pawar) यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजने (Pradhan Mantri Gramsadak Yojana) अंतर्गत पेठ (Peth), दिंडोरी (Dindori), येवला (Yeola), चांदवड (Chandwad), मालेगाव, निफाड व कळवण (Kalwan) या तालुक्यांसाठी ७३१९.९२ लक्ष इतक्या किमतीच्या ११६.५३ किमी लांबीच्या १६ कामांना मंजुरी मिळाली आहे.

या रस्त्यांबाबत या परिसरातील नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. ही कामे मंजूर झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन शेतमाल वाहतुकीच्या (Agricultural transport) दृष्टीने मदत होणार आहे.

तालुकानिहाय रस्ते नांदगाव तालुका- रस्ता लांबी १०.४५ किलोमीटर (७६०.२०लक्ष),

पेठ तालुका -तिळभाट ते गांगोडबारी शिंदे रस्ता ५.७५ किलोमीटर (३६९.३६लक्ष)

दिंडोरी तालुका-इजिमा १९८ गोंदेगाव ते खेडगाव बहादुरी रस्ता लांबी ८.८५० किलोमीटर (५५८.१५लक्ष), राज्य मार्ग -२२ उमराळे हातनोरे रस्ता लांबी १३.५०० किलोमीटर (९४७. ७५लक्ष)

येवला तालुका- जळगाव नेऊर पाटोदा रस्ता लांबी ६.८७ किलोमीटर ( ३४८.०९लक्ष),कानडी ते ठाणगाव गुजरखेडे रस्ता लांबी ६.६०० किलोमीटर (३०४.१७),पिंपरी ते सावरगाव, तांदुळवाडी रस्ता लांबी ५.३७५ किलोमीटर (३२३.१५ लक्ष),

चांदवड तालुका- चांदवड ते तळवाडे रस्ता सहा किलोमीटर (३४०.५२ लक्ष), मालेगाव तालुका-राममा-०३ ते कौळाणे चंदनपुरी रस्ता लांबी ११ किलोमीटर (५२३.९०लक्ष ),

निफाड तालुका - दात्याने ते शिरसगाव रस्ता ६.२००किलोमीटर ( 414.19 लक्ष),नैताळे, कोळेवाडी,सोनेवाडी निफाड रस्ता लांबी ३.८०० किलोमीटर (२५७.२९लक्ष), प्रजिमा- २७ भुसे ते महाळसाकोरे रस्ता लांबी ३.३०० किलोमीटर (२१४.७५ लक्ष), नांदूर-मध्यमेश्वर ते धरणगाव खडक रस्ता लांबी ५.३२० किलोमीटर (३३५. ९० लक्ष ),

कळवण तालुका- साकोरे ते जिरवाडे नविबेज रस्ता लांबी १३.५००किलो मीटर ( ८६१. ३४ लक्ष), खेडगाव ते रवळजी जयदर रस्ता लांबी ६.४१० किलोमीटर (३५८.३८ लक्ष), गोसराणे ते गंगापूर रस्ता लांबी ६. ६०० किलो मीटर (३७५ .७८ लक्ष)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com