देशदूत इम्पॅक्ट : विमानतळ जोडणार्‍या रस्त्याचे कामे होणार

देशदूत इम्पॅक्ट : विमानतळ जोडणार्‍या रस्त्याचे कामे होणार

जानोरी | वार्ताहर | Janori

दिंडोरी (dindori) लोकसभा (loksabha) व विधानसभा (vidhansabha) आज भुषण ठरले आहे. कारण दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार (mp dr. bharti pawar) यांना केंद्रीय आरोग्यमंत्री (Union Health Minister) व दिंडोरी - पेठ (peth) विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ (MLA Narhari Jirwal) यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

त्याच दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) नाशिक विमानतळ (nashik airport) आहे ते देखील दिंडोरी तालुक्यासाठी भुषणावहच समजावे लागेल परंतु त्या विमानतळाला जोडणारे रस्ते मात्र आज दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे हे मात्र दुर्दैवाने दुर्भाग्य समजावे लागते. याकडे केंद्रिय मंत्री व विधानसभा उपाध्यक्ष लक्ष केंद्रित करतील का? असा सवाल दैनिक देशदूतच्या (deshdoot) माध्यमातून विचारताच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाला अक्राळे-विमानतळ रस्त्यासाठी लवकरच विशेष निधी (fund) उपलब्ध करून देण्याचे व जानोरी- आंबे-दिंडोरी- म्हसरूळ रस्त्यावरील खड्डे (potholes) बुजवण्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

पावसाळा आला की खड्ड्यांचे साम्राज्य आणि नंतर रस्त्याला ठिगळं मारून तात्पुरती मलमपट्टी हे दरवर्षीचे दृश्य. परंतु ठिगळं मारत किती दिवस जीवांशी खेळणार? पावसाळा संपताच तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात येईल म्हणून संबंधित विभागाने फक्त आश्वासनेच दिले. परंतु अद्याप रस्ता दुरुस्तीला तारीख पे तारीख मिळत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत असल्याची सविस्तर बातमी दैनिक देशदूतने प्रसिद्ध केली होती.

त्यावर दिंडोरी लोकसभेच्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विशेष दखल घेत संबंधित विभागाशी संपर्क साधत माहिती घेऊन रस्ता दुरूस्तीसाठी आवश्यक पुर्तता करून काम त्वरित चालू करण्याचे आदेश दिले आहे. या रस्त्यावरील लांबीतील खड्डे भरण्याच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. या रस्त्यावरील खड्डे तीन आठवडयांच्या आत भरुन घेण्यात येतील.

असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. अक्राळे-विमानतळ रस्ता हा गुजरात - शिर्डीला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून वणी- सप्तशृंगीदेवी भक्तांसाठी सोयीस्कर मार्ग आहे. रोजची रहदारी मोठ्या प्रमाणात होत आहे. अवजड वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अक्राळे ते नाशिक एअरपोर्ट रस्त्यावर खड्डे पडले असल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. वाहने चालवताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना होणारे लहान मोठे अपघात होत आहे.

अक्राळे फाटा ते विमानतळ हा रस्ता पुर्ण खराब झाला असून सध्या त्या रस्त्यावरही पुर्ण खड्डे झाले असुन वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. समोरच्या वाहनाचा पुर्ण अंदाज येत नाही व खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने समोरासमोर एकमेकांना धडकतात. त्यामुळे हा रस्ता त्वरित होणे अपेक्षित आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. पवार यांनी याची दखल घेऊन संबंधित विभागाला कामाला लावले असले तरीही तो लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष निधीची मागणी

पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत सदर रस्ता झाला असून संबंधित विभागाने सध्याच्या परिस्थितीची दखल घेत सदर रस्त्याचे खड्डे भरून त्यावर योग्य त्या दुरूस्तीसाठी विशेष निधीची मागणी वरिष्ठ स्तरावर केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्याला तात्काळ मंजुरी मिळणार आहे.

अक्राळे-विमानतळ रस्ता असुन अडचण नसून खोळंबा झाला आहे. जानोरी- आंबे दिंडोरी -म्हसरूळ रस्त्याचीही दयनीय अवस्था आहे. दैनिक देशदूत ने याची सविस्तर बातमी टाकत नागरीकांची समस्या रोखठोक मांडली व त्याची दखल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार व संबंधित विभागाने घेतली त्याबद्दल मी नक्कीच आभार मानतो.सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले असले तरीही तो लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

- शंकरराव काठे, माजी जि.प. सदस्य

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com