रस्त्यांमुळे ग्रामीण विकासाला चालना: आ. दिलीप बोरसे
Dipak

रस्त्यांमुळे ग्रामीण विकासाला चालना: आ. दिलीप बोरसे

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

बागलाणच्या (baglan) पश्चिम भागातील रस्ते विकासाचा (Road development) अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद (zilha parishad) व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Public Works Department) प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबधित विभागाला दिल्या असल्याचे स्पष्ट करून रस्ते दर्जेन्नोत झाल्यास रस्त्यांचे जाळे मजबूत होऊन ग्रामीण विकासाला (Rural development) चालना मिळेल, असे प्रतिपादन आ. दिलीप बोरसे (mla dilip borse) यांनी केले.

आदिवासी विकास विभागाच्या (Department of Tribal Development) चार कोटी बासष्ट लाख रुपये खर्चाच्या मंजूर रस्त्यांचे भुमिपूजन (bhumipujan) आ. बोरसे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून रा.स्व. संघाचे प्रदीप बच्छाव, सटाणा बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे, संचालक संजय सोनवणे, तुकाराम देशमुख, माजी सभापती मधुकर ठाकरे, सोमनाथ सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी केरसाणे, चौंधाणे, जोरण, निकवेल, दहिंदुले, भावनगर, करंजखेड ,पठावे दिगर येथे पूल बांधणे, पिसोरे रस्ता, तळवाडे दिगर येथे पूल बांधणे आदी विकासकामांचे भूमिपूजन आ. बोरसे यांच्या हस्ते झाले.

एखाद्याकडून समाजाचे भले होत नसेल तर त्याने वाईट तरी करू नये. बागलाण तालुक्यात (baglan taluka) याउलट प्रवृत्ती फोफावत असल्याचे सांगून बागलाणच्या विकासासाठी आम्ही काही तरुण नेते एकत्र येऊन निधी (fund) आणतो, मात्र काही समाजविघातक प्रवृत्ती त्याला खोडा घालत आहेत. लवकरच अशा विघ्नसंतोषी लोकांचा खरा चेहरा लोकांसमोर आणलाजाईल, असा इशारा आ. बोरसे यांनी विरोधकांना दिला. चौंधाणे येथील रामगीरबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्या धर्तीवर तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचाही विकास करण्यात येईल, अशी ग्वाही देखील आ. बोरसे यांनी दिली.

कार्यक्रमास गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, शाखा अभियंता शेखर पाटील, चौंधाणे सरपंच लीलाबाई मोरे, माजी सरपंच राकेश मोरे, जोरण सरपंच सुभाष सावकार, दिनेश सावकार, काकाजी देवरे, कैलास सावकार, हेमंत पवार, सुकदेव सावकार, राजेंद्र सोनवणे, सर्जेराव बेडीस, वसंत सोनवणे, मनोहर सावकार, केशव सावकार, चित्रा मोरे, संतोष जाधव, यशवंत सोनवणे, विजय वाघ, बाळासाहेब वाघ, संदीप सोनवणे, सुशील सोनवणे, रवींद्र सोनवणे, संजय अहिरे, राजेंद्र मोरे, महादू सावकार, यशवंत देशमुख, संजय वाघ, राजेंद्र पवार, नीलेश अमृतकर, पियुष सूर्यवंशी, मयूर आहेर, कुणाल सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com