दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामांना प्रारंभ

दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामांना प्रारंभ

ओझे । वार्ताहर Oze

दिंडोरी (Dindori) तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना पाऊस थांबताच दिवाळी (Diwali) नंतर सुरुवात होईल. अनेक रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून काही रस्त्यांना कोविडमुळे (Covid-19) निधी (Fund) मिळत नव्हता. सध्या तीही अडचण दूर झाली असून लवकरच रस्त्यांसाठी निधी प्राप्त होणार असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांनी दिली.

कादवा म्हाळुंगी (Kadava Mhalungi) येथील विविध विकासकामांचा शुभारंभ झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे (Shriram Shete) होते.

कादवा म्हाळुंगी येथील गावअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, स्मशानभूमी सुशोभिकरण करणे तसेच गावात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवणे आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतीकडून जि. प. शाळेला संगणक भेट देण्यात आला. आ. नरहरी झिरवाळ यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. गावातील व परिसरातील समस्या समजून घेतल्या.

कादवा म्हाळुंगी ते म्हेळुस्के रस्त्यावर दोन पुलांची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जि. प. सदस्य भास्कर भगरे, योगेश गोसावी, तोसिफ मनियार, सरपंच सविता गांगोडे, उपसरपंच शीलाबाई आहेर, ग्रा. पं. सदस्य माधव निकम, पंढरीनाथ गोतरणे, पंडित सहाळे, ललिता गांगोडे, कविता गांगोडे, शांताराम पिंगळ, तानाजी देशमुख, सुरेश शिंदे, साहेबराव आहेर, रमेश आहेर, दशरत मेधने, रघुनाथ बोके, छबू गवळी, दामोधर बुनगे, संजय आहेर, मधुकर देशमुख, उत्तम घोरपडे, प्रकाश आहेर, ग्रामसेवक चेतन जाधव, परशराम सहाळे, जगन गांगोडे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com