उपोषणाचा इशारा देताच रस्त्याचे काम सुरू

उपोषणाचा इशारा देताच रस्त्याचे काम सुरू

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गंगापूर ते दुगाव Gangapur To Dugaon Road या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असताना दररोज होणारे अपघात लक्षात घेऊन भाजपचे नाशिक तालुका अध्यक्ष नितीन गायकर Nitin Gaikar- BJP यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला इशारा अवघ्या पाच दिवसात कामाला येत बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरुस्ती कामाला शुभारंभ केला आहे.

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून गंगापूर ते दुगाव हा रस्ता देखील त्याला अपवाद नाही. या रस्त्यावरील हॉटेल गंमतजंमत जवळ गंगापूर पुलाजवळ शितल पाटील व संगीता पाटील या मायलेकी दुचाकीवरुन जात असताना खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात त्यां जबर जखमी झाल्या. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले.

नुकतेच नाशिक येथे आलेले केंद्रिय वाहतूक रस्ते मंत्री नितींन गडकरी यांनी रस्त्यांच्या कामासाठी 3 कोटीचा निधी दिल्याचे सांगितले. टेंडरदेखील झाले, परंतु अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे गंगापूर ते दुगाव या रस्त्यासाठी निधी उपलब्ध असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. दररोज घडणार्‍या अपघाताची शृंखला कुठेतरी थांबवणे गरजेचे असल्याने बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरुस्तीसाठी कार्यवाही केली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा गायकर व त्यांच्या सहकार्‍यांनी दिला होता. त्याची दखल घेत काल हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले.

मात्र यावर समाधानी नसून लवकरत लवकर नवीन रस्ता व्हावा, अन्यथा पुढील आठवड्यात भारतीय जनता पार्टी नाशिक याच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा गायकर यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com