आंदोलनाच्या इशार्‍यानंतर रस्त्याचे काम सुरू

आंदोलनाच्या इशार्‍यानंतर रस्त्याचे काम सुरू

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील दत्तमंदिर चौक व परिरातील रस्ते दुरुस्तीसाठी खड्ड्यात झोपून आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी प्रशासनाला दिल्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, निलेश वाघ, राजू शिंदे, विजय सोनी, मुनाफ शेख, मोनू खडताळे, बंटी पवार, पिंटू नेटवाणे, सचिन डावरे, सोनू दोलानी आदी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले होते.

नाशिक-पुणे मार्गावर गॅस पाइप लाईनसाठी खड्डे खोदण्यात आले होते. अर्धवट खोदकाम मुळे नागरिक व वाहनचालकांचे अपघात होत होते. काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा ट्रकखाली दत्त मंदिर चौकात मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी सोबत खोदलेल्या खड्यांमध्ये झोपून आंदोलन करण्याचा इशारा संजय पगारे यांनी दिला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.

नाशिकरोड, जेलरोड परिसरातील सर्व खड्डे व फोडलेले रस्ते त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com