निफाड | Niphad

आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ आप्पा वणारसे यांच्या प्रयत्नाने लेखा शीर्ष ५०५४ अंतर्गत कामाची रक्कम रुपये एक कोटी ७८ लाख निधी मंजूर झाला आहे.

तालुक्यातील चितेगाव, वरहेदारणा, लालपाडी, दारणा सांगवी तसेच डोंगरवाडी परिसरातील रस्त्याचा कामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वणारसे यांच्या हस्ते झाले.

दारणा सांगवी तसेच परिसरातील अन्य गावांच्या रस्त्याच्या समस्या अनेक दिवसापासून नागरिकांना भेडसावत होती. पावसाळ्यात तर रस्त्यावरून नागरिकांना चालणे मुश्किल होते.

यामुळे परिसरातील नागरिकांनी नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना रस्त्याच्या समस्येचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार पाठपुरावा करीत रस्त्याला कामाला मंजुरी मिळाली.