रस्ते दुरुस्तीस प्रारंभ

सेवकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार
रस्ते दुरुस्तीस प्रारंभ

नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon

नांदगांव शहरात जागो-जागी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी मुख्याधिकारी पंकज गोसावी यांना निवेदन दिले होते.

ऐन सणासुदीच्या काळात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने तसेच रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. यासंदर्भात येथील सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले होते.

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी आग्रही मागणी सामाजिक संस्थांनी केली होती. या गोष्टीची दखल घेऊन नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला असून सदर काम सुरू असताना सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी स्वतः उभे राहून सदर काम पूर्ण करून घेतले.

शहरातील माजी सैनिक, शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था, जेष्ठ नागरिक संघ, युवा फाउंडेशन, भारती बहुउद्देशीय संस्था या संस्थांचे पदाधिकारी यांनी या कामी पुढाकार घेतला होता. यावेळी नगरपरिषदेचे इंजिनियर वैभव चिंचोळे आणि सर्व खड्डे भरणारे कामगार वर्गाचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

माजी सैनिक नानासाहेब काकलीज, शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थाचे सुमित गुप्ता, जायंटस् ग्रुपचे नरेंद्र पारख, रमनलाल लोढा, दिनकर आहेर आदी सदस्य उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com