
येवला | प्रतिनिधी Yeola
येवला तालुक्यातील येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता Ankai to Bhagatwadi Road अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे राहणारे 50 ते 60 कुटुंबाचा गावाशी संपर्कच तुटला होता.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य अलकेश कासलीवाल यांच्याशी संपर्क साधून व्यथा सांगीतली,त्यांना शेतीमाल वाहतूक करणे मजूर ने आण करणे, दुग्धव्यवसाय सगळंच ठप्प झालं होतं, सदर रस्त्यावर खर्च करणे ग्रामपंचायत ला शक्य नव्हतं, जिल्हा परिषद तातडीने काम करणार नाही म्हणून अंकाईचे सरपंच नागिना कासलीवाल, उपसरपंच शिवम अहिरे, सदस्य डॉ. प्रितम वैद्य, अलकेश कासलीवाल, सागर सोनवणे व संतोष टिटवे यांनी स्वखर्चाने जेसिबी दिला .
ग्रामस्थ दत्तू सोनवणे, भगवान जाधव, विलास जाधव, बाळू सोनवणे, पारुबा राऊत, सागर देवकर, बाळू जाधव, नंदू जाधव, नितीन देवकर, रवींद्र जाधव, आदींनी आपला ट्रॅक्टर देऊन शाम व्यापरे, किरण बडे, मारुती वैद्य, भगवान जाधव, किरण देवकर, अण्णा जाधव, शांताराम वैद्य, सचिन जाधव, शंकर चव्हाण व सर्व तरुणांनी मिळून रस्त्याचे काम पूर्ण करून प्रशासनाचे लाखो रुपये वाचवले व स्वतःच्या समस्या वर स्वतःच मार्ग काढत सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
येवला तहसीलदार प्रमोदजी हिले, भुजबळ साहेबांचे स्वीय सहायक लोखंडे साहेब,बीडीओ उन्मेष देशमुख,सभापती प्रविणजी गायकवाड आदींनी सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थांचे कौतुक करत अभिनंदन केले.