अन् 'त्यांनी' केली रस्त्याची लोकसहभागातून दुरूस्ती

अन् 'त्यांनी' केली रस्त्याची लोकसहभागातून दुरूस्ती

पिंगळवाडे । वार्ताहर Pimpalwade - Baglan

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) पिंगळवाडे ते विजयनगर पांधन रस्त्याची दुरवस्था (Poor Road Condition) संबंधित विभागातर्फे दुर केली जात नसल्याने या खड्डेमय रस्त्याने त्रस्त झालेल्या परिसरातील शेतकरी (Farmers) व ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकसहभागातून रस्त्याची डागडुजी केली. या रस्त्याचे डांबरीकरण (Asphalting) लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी करत सदरची समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी पिंगळवाडे, विजयनगर परिसरातील शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

गत दोन-तीन वर्षापासून पिंगळवाडे परिसरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याकारणाने पिंगळवाडे ते विजयनगर पांधन रस्ता ठिकठिकाणी खड्डे (Potholes) पडल्यामुळे पूर्णपणे खराब अवस्थेत पोहचला होता. या रस्त्याची आजची परिस्थिती बघता शालेय विद्यार्थी (Students), शेतकरी वर्ग, मजूर, जनावरे यांना या रस्त्याने वापर करणे कठीण झाले होते.

रस्त्यावरून वाहनेच काय पायी चालणे देखील जणू तारेवरची कसरत ठरत होती. खड्ड्यांमुळे ठेचा खात धडपडत जावे लागत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या दुखापती वाढल्या होत्या. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक वाहनधारक शेतकर्‍यांना वाहन घसरल्याने जायबंदी व्हावे लागले आहे. खड्ड्यांमुळे वाहन उधळत असल्याने शेतकर्‍यांना आपल्या शेतमालाची (Farm goods) हेळसांड सहन करावी आहे.

वाहतुकीसाठी सदर रस्ता मुख्य पर्याय असल्याने त्याच्यावरून मार्गक्रमण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती व्हावी अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. मात्र संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्रस्त झालेल्या स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

शेतकर्‍यांनी आपल्या खिशाला झळ देत हा रस्ता सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे. जेसीबीच्या (JCB) माध्यमातून सदर रस्त्याची डागडुजी करण्यात येवून खड्डे बुजविले गेल्याने हा रस्ता किमान चालणेयोग्य केला गेला. परिसरातील सर्वच शेतकर्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी अधिकार्‍यांनी योग्य तो निधी (Fund) उपलब्ध करावा ही मागणी पिंगळवाडे येथील शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

Related Stories

No stories found.