ठाणगाव । वार्ताहर Surgana / Thangaon सुरगाणा तालुक्यातील मधुरी ते राक्षसभुवन या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहे..त्वरीत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी केली आहे. वाहन चालक व प्रवासी मधुार रस्त्याने प्रवास करतात. बार्हे येथे आठवडे बाजार सुद्धा असतो.येथील नागरिक बार्हे येथे बाजाराला जातात.त्यांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत होती, त्या अनुषंगाने लोक सहभागातून ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले.यावेळी शिक्षक अनंता बिरारी, रविंद्र नाठे, मनोहर नाठे, नंदराज भरवाड, पप्पू बागूल, प्रमोद भोये, ममता दिवे, संगिता नाठे, लिला दिवे, चिमणाबाई बागुल, रेश्मा बिरारी, जानीबाई कुवर, यमुनाबाई बिरारी, रविना नाठे आदी उपस्थित होते.मधुरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना व प्रवाशी वर्गांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून खड्डे बुजवले. येणार्या काळात लवकर रस्त्याची दुरूस्ती करून डांबरीकरण करावे अशी आमची मागणी आहे.अनंता बिरारी, स्थानिक नागरिक