पावसामुळे रस्त्यांची वाताहत

पावसामुळे रस्त्यांची वाताहत

चांदवड । प्रतिनिधी | Chandwad

पावसाळा (monsoon)सुरू होऊन महिना झाला असून सततच्या पावसामुळे (heavy rain) शहरात ठिकठिकाणी पाणी साचून मोठमोठे खड्डे (potholes) निर्माण झाले आहेत.

आधीच नगरपरिषदेतर्फे (nagar parishad) चोवीस तास पाणी योजनेसाठी शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यात पावसामुळे सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांचे दळणवळण मुश्किल बनले आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेत पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे (potholes) तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने असून रस्त्याच्या कडेला फळे, भाजीपाला (Vegetables) विक्रीची दुकाने आहेत. या रस्त्याने एखादे दुचाकी किंवा चारचाकी वाहन गेल्यास रस्त्याच्या कडेला असणार्‍या दुकानदारांच्या मालावर चिखलयुक्त दूषित पाणी (Contaminated water) उडून नुकसान होत आहे.

दुकानदारांकडून नगरपरिषदेकडे (nagar parishad) वारंवार रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याची मागणी केली जात असूनही अद्याप नगरपरिषदेतर्फे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तालुक्यातील मुख्य पोलीस ठाण्याकडे जाण्यासाठी एकच रस्ता असून या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला सरकारी दवाखाना (Government Dispensary) व मटन मार्केट असल्याने हजारो लोकांची नियमित वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

शहरातील नागरिकांना बसस्थानक, सरकारी दवाखाना, मटन मार्केट तसेच शाळा-महाविद्यालयाकडे जाणार्‍या विद्यार्थी व नागरिकांना मोठी अडचण होत आहे. चांदवड बाजारतळ येथील दुकानदारांनीही नगरपरिषदेकडे वेळोवेळी पावसाळ्याआधी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. मात्र अजूनही नगरपरिषदेने उपाययोजना केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरपरिषदेने शहरातील विविध रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यातून लवकरात लवकर मुक्तता करावी, अशी अपेक्षा चांदवडकरांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com