
सटाणा | प्रतिनिधी Satana
येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्ताने सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.या पथसंचलनाचा प्रारंभ शहराचे आराध्य दैवत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराचा पासून करण्यात आला.
शहरातील कॅप्टन अनिल पवार चौक, नेहरू रोड, सरकारी दवाखाना, महात्मा फु ले चौक , बसस्थानक, ताहाराबाद रोड, मित्रनगर, साठ फु टी रोड, ताहराबाद रोड, शिवतीर्थ, टिळक रोड, पोलिस चौकी, चावडी चौक, महालक्ष्मी मंदिर या मार्गावरून देवममामलेदार महाराज मंगल कार्यालय येथे सांगता करण्यात आली.
यामहामार्गावर सडा, रांगोळी काढून संचलनवेळी पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. या सघोष संचलनात संघाचे बॅन्ड पथक, घोडेस्वार, खाकीपॅन्ट व पांढरा शर्ट परिधान केले संघाचे कार्यकर्ते व शहरासह परिसरातील राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते सामील होते.