पळसे ते जुना नाशिक साखर कारखाना रस्त्याचे रुपडे पालटणार

पळसे ते जुना नाशिक साखर कारखाना रस्त्याचे रुपडे पालटणार

देवळाली कॅम्प | Deolali Camp

नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) पळसे गाव (Palse Village) ते नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (Nashik Co-operative Sugar Factory) जुना रस्ता दुरुस्ती (Road Repair Work) करणे कामी शासनाच्या वतीने 3 कोटी 60 लाखाचा निधी आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांच्या माध्यमातून मंजूर झाला. या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

गेली अनेक दिवसांपासून जुना साखर कारखाना रस्त्याचे काम रेंगाळत होते. या कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांनी केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहे. 3 कोटी ६० लाखांचा निधी बजेटमधून मंजूर करून घेतला. या निधीमुळे उर्वरीत २२०० मीटरचा रस्त्याच्या कामाला मुर्हुत लागला आहे.

या रस्त्यामुळे पळसेगावासह नानेगाव, वडगाव पिंगळा, भगुर, शेवगेदारणा व नासाका याभागाचे दळणवळण वाढणार असून विकासाच्या दिशेने पंचक्रोशीची प्रगती होईल, हा रस्ता 2200 मीटर लांबीचा असून रुंदी १५ फुटाची आहे.

एकाच वेळी दोन वाहने पास होतील. माजी आमदार योगेश घोलप यांनी देखील या रस्त्याच्या कामाला त्यांचे कारकिर्दीत १.८६ कोटी इतका निधी मंजूर केला होता, मात्र संबधित ठेकेदाराने काम निष्कृष्ट दर्जाचे केल्याने शेतकरी, प्रवाशी नागरीक यांनी काम बंद केले होते. त्याची पुर्नवृत्ती होऊ नये याची दक्षता घेण्याची वेळ पळसेकरांवरती आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com