नाशिकरोड | Nashik
नाशिक रोड परिसरातील रहदारीचे समजले जाणारे प्रमुख रस्ते खोदले असल्याने नागरिक त्रस्त झाले असून सर्वत्र रस्त्यावर धूळ व मातीचे साम्राज्य पसरले आहे.
नाशिकरोड परिसरातील बिटको चौक पवन हॉटेल कडून पोलीस स्टेशन कडे जाणारा प्रमुख रस्ता तसेच मुक्तिधाम ते बिटको चौक येथील हॉटेल महाराष्ट्र पर्यंत असलेला प्रमुख रस्ता त्याचप्रमाणे मुक्तीधाम जवळील सोमानी उद्यान समोरील रस्ता.
जुनी स्टेट बँक राजेंद्र कॉलनी परिसरातील वाहतुकीचा प्रमुख रस्ता त्याचप्रमाणे गोसावीवाडी परिसरातील पेट्रोलपंपा जवळून बिटको हॉस्पिटल कडे जाणारा रस्ता असे सर्व प्रमुख रस्ते गेल्या काही दिवसापासून खोदुन ठेवलेली आहे.
या रस्त्यावर मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे सदर चे रस्ते खोदून ठेवल्यामुळे नाशिक रोड कर तसेच वाहन चालक मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली आहे.
परंतु सध्या लॉक डाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी आहे. मात्र खोदलेल्या रस्त्यामुळे सर्व ठिकाणी धुळ व माती पसरलेली आहे. काही ठिकाणी रस्ते बुजविण्यात आले, परंतु त्यावर डांबरीकरण करण्यात आले नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.