इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर गदा; समता परिषदेतर्फे येवल्यात रास्ता रोको

इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर गदा; समता परिषदेतर्फे येवल्यात रास्ता रोको

येवला | प्रतिनिधी | Yeola

देशातील मागासवर्गीयांच्या जनगणनेची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विहित मुदतीत सादर न केल्याने मागासवर्गीयांना देण्यात आलेले राजकीय आरक्षण टिकू शकले नाही. केंद्र शासनाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करावी...

तसेच राज्य शासनाने केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज विंचुर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशातील मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणावर गदा आल्याने सुमारे ६० जार प्रतिनिधींच्या जागा अडचणीत येणार आहेत.

या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी पं. स. सभापती प्रकाश वाघ, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार, हुसेन शेख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काळे, विनायक घोरपडे, किशोर सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

तसेच केंद्र शासनाने व राज्य शासनाने याबाबत विशेष जबाबदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात विहित माहिती सादर करून फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राधाकिसन सोनवणे, अरूण थोरात, वसंत पवार, संजय बनकर, ज्ञानेश्‍वर शेवाळे, किसन धनगे, दिपक लोणारी, प्रवीण बनकर, मुश्ताक शेख, मलिक शेख, संतोष परदेशी, अमजद शेख, गणेश गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com