बापरे! पावसामुळे अर्धा रस्ताच खचला

बापरे! पावसामुळे अर्धा रस्ताच खचला

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्ता (Nashik-Trimbakeshwar Road) लगत महामार्ग क्रमांक ३७ तळेगाव (अंजनेरी) (Talegoan) लगत जाभुळ जीरा रस्ता (Jabhul Jira Road) पावसाच्या पाण्याने अर्ध्याहून अधिक खचला आहे. यामुळे तळेगाव ते जातेगाव हा रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे...

या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी वाहने या रस्त्याने नेऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश खांडबहाले (Ramesh Khandbahale), तळेगावचे सरपंच मंगला निंबेकर (Mangala Nimbeker), उपसरपंच कमला दाते (Kamala Date) यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com