आरके ते रामसेतू पूल मार्ग वाहतुकीस बंद

बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलीसांचे पाऊल
आरके ते रामसेतू पूल मार्ग वाहतुकीस बंद
USER

नाशिक । Nashik

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असानाही बाजारपेठांमधील गर्दी कमी होताना दिसत नाही. शहातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा भांडीबाजार ते रामसेतुपूल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्ति तैनात करण्यात आला आहे.

सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल रविवार कारंजा ते मंगेश मिठाई, सोन्या मारूती चौक, भांडी बाजार व रामसेतु पूल हा मार्ग सकाळी 7 ते 11 वाजेच्या बाजार खुला असल्याच्या कालावधीत वाहतुकीस बंद राहणार आहे. यासह रविवार कारंजा, गोराराम गल्ली, सोनारबाजार हा मार्गही बंद असणार आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी काढले आहेत.

हा मार्ग बंद असल्याने नागरीकांनी रामसेतु पुलाकडून बादशाही कॉर्नर, प्रकाश सुपारी दुकान दहिपूल या मार्गाचा वापर करावा. रविवार कारंजाकडून जाणार्‍या वाहनांनी सांगली बँक सिग्नल, शालीमार, गंजमाळ, दुधबाजार चौक येथून इतरत्र जावे, तसेच सुर्यनारायण मंदिर, पंचवटी कारंजा, गाडगेमहाराज पूल येथून रामसेतु अगर दहिपूल असा प्रवास करावा असे अवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com