गोदावरीचे नाशिक म्हणणे वावगे ठरणार नाही

नदी महोत्सवात डॉ. डहाके यांचे प्रतिपादन
गोदावरीचे नाशिक म्हणणे वावगे ठरणार नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकची गोदावरी म्हणण्यापेक्षा गोदावरीचे (Godavari) नाशिक म्हणणे वावगे ठरणार नाही, असे मत गोदावरी अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. शिल्पा डहाके (Dr. Shilpa Dahake) यांनी व्यक्त केले...

नदी महोत्सवाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नाशिकची गोदावरी याविषयावर त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलतज्ज्ञ राजेश पंडित (Rajesh Pandit) उपस्थित होते.

यावेळी बोलताना डहाके यांनी पंजाब ते नाशिक प्रवास कथन केला. यावेळी त्यांनी सांगितले की,पूर्वी पासून गंगा,यमुना या नद्यांची चर्चा जास्त होती. मात्र भारतात दुसर्‍या क्रमांकाची नदी असलेली गोदावरी नदीबद्दल असलेली ओढ यामुळे तिच्याबद्दल अभ्यास करायला 2015 च्या कुंभमेळ्यापासून सुरुवात केली. त्यावेळी नदीचे पाणी दिसायला तरी स्वच्छ होते. पुर्वी त्यात असलेल्या पाणवेली काढण्यात आल्या होत्या.

नाशिकच्या नकाशामध्ये गोदावरी नदी ज्याप्रकारे दाखवण्यात आली आहे ते म्हणजे दिशाभूल करणारे आहे. ही नदी कशी आहे ती नुसती रेष नसून त्यात येणार्‍या पाण्याचे दुसरे स्त्रोत देखील आहे. नदीमध्ये असलेले सर्व घटक त्यामध्ये असलेले जीवजंतू यामुळे नदी बनते. नाशकाची गोदावरी ही केवळ गोदाघाटावर नसून इतरत्रदेखील आहे.

नळातून पाणी यावे याकरिता ब्रिटिश काळात 1920 सलात संकल्पना मांडली गेली त्यावेळी यासाठी विरोध झाला मात्र गोदावरीचे पाणी घरातील नळाला येऊ लागले. मात्र जसे पाणी घरात आले तसे घरातील सांडपाणी देखील घराबाहेर जाण्याकरिता सुरवात झाली परिणामी हे सांडपाणी नदीत सोडले जाऊ लागल्याने नदी प्रदुषित होऊ लागली.

रामकुंडावर (Ramkund) भाविक भक्तिभावाने नदिची पूजा करतात तर दुसरीकडे त्याच नदीत शहरातील सांडपाणी मिश्रित करतात. गोदावरीबद्दल संशोधन करत असताना तपोवनातील मल जल प्रक्रिया केंद्रातून सुरवात केली. नाशिक शहराच्या अगोदरच धरणे बांधली गेली असल्याने वाहती नदी ही एकाच जागी स्थिरावली. आपण नदीमध्ये कचरा व सांडपाणी टाकतो ते कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याकडे पाणी परत येते.

यावेळी डॉ. डहाके यांनी प्रत्येक ऋतूमधील गोदावरी बघितल्याचे बोलतांना सांगितले की, 2016 सालात कोरडी नदी बघितली आणि अवघ्या दोन ते तीन महिन्यांत त्याच नदीला दोन वेळा महापूर आल्याचेदेखील बघितले. नाशिकमध्ये सोमेश्वरजवळ असलेल्या गोदावरी परिचय उद्यान हे कदाचित नाशिककरांना माहीत नसेल कारण ते नेहमीच बंद असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन आनंद बोरा यांनी तर आभार महेश शिरसाठ, दत्तात्रय शिरसाठ यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com