‘आयमा’ निवडणूकीसाठी प्रतिस्पर्धी गटाच्या बैठका

‘आयमा’ निवडणूकीसाठी प्रतिस्पर्धी गटाच्या बैठका

सातपूर । प्रतिनिधी Satpur

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) ची निवडणूक AIMA Election घोषित झाल्यानंतर पारंपारीक विरोधी पॅनल उद्योग विकास पॅनलचे समर्थक सक्रिय झाले आहेत.त्यानिमत्ताने पून्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचा फड रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयमाच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच स्थरातून याबाबत उलट सूलट प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने या वातावरणात निवडणूका होतील किंवा नाही याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. तरीही निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी दरोनही गटाकडून केली जात आहे.

उद्योग विकास पॅनलची तातडीची बैठक घेऊन सत्ताधार्यांना शह देण्यासाठी रणनीती आखण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधार्यांना शह देण्यासाठी उद्योग विकास पॅनलच्या Udyog Vikas Panel समर्थकांनी तातडीची बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीत संजय महाजन यांनी या बैठकीत अध्यक्षपदासाठी पसंती दिल्याचे संकेत आहेत.

सत्ताधार्यांना विरोधात दमदार उमेदवार देण्यावर चर्चा करण्यात आली. या सोबतच प्रचार यंत्रणा उभी करताना सत्ताधार्यांच्या विरोधातील सभासदांना एकत्र करणे, आयमाच्या माजी पदाधिकार्यांची भेट घेणे, निवडणुकीची रणनीती ठरविणे याबाबत चर्चा करण्यात आली.

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने निवडणूक होते की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जर निवडणूक झालीच तर मात्र विरोधकांकडून सुरुवातीपासूनच मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे आयमाची निवडणूक चुरशीची होणार असे चित्र दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com