करोना पश्चात लहान मुलांना एमआयएससीचा धोका

ही आहेत लक्षणे
करोना पश्चात लहान मुलांना एमआयएससीचा धोका

नाशिक। Nashik

जिल्ह्यात लहान मुलांमध्ये कोरोना पाश्चात मल्टिसिस्टम इंफ्रामेट्री सिंड्रोम (एमआयएससी) (MISC) या आजाराचा धोका वाढला असून आतपर्यंत जिल्ह्यात काही मुलांना याची बाधा झाल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत खात्री केली जात असल्याचे आरोग्य प्रशासनाने(Health Department0 म्हटले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत (Corona second wave) काही प्रमाणात लहान मुलांनाही बाधा (Corona Positive Child Patients) झाली मात्र हे प्रमाण अल्प होते. आता तिसरी लाट येणार आहे. तिसर्‍या लाटेचा (Corona Third wave) सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी दुसर्‍या लाटेत कोरोना झालेल्या मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यालाच मल्टिसिस्टम इंफ्रामेट्री सिंड्रोम (एमआयएससी) म्हणतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास आजार बळावू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या आजाराचे जिल्ह्यात काही रूग्ण असून यात 6 ते 10 वर्ष वयोगटातील लहान मुलांचा समावेश आहे. तिसर्‍या लाटेेच्या धोक्याच्या अनुषगांने जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्स (Task Force) कडून याची खात्री करण्यात येत आहे.

कोरोनाची बाधा झाल्यानंतर अनेक मुलांमध्ये लक्षणे नसतात. परंतु, यातून मुक्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे त्यांच्या शरीरावरील विविध अंग प्रभावित होतात. यामुळे मुलांना झटके येणे, हृदय व यकृताशी संबंधित समस्या पुढे येत आहे, असे बालरोगतज्ज्ञ सांगत आहेत.

या आजाराने प्रभावित असलेल्या मुलांना वेळीच उपचार न मिळाल्यास हृदयाची गती कमी होते. यामुळे रक्ताभिसरण प्रभावित होते. यासाठी कोरोना पश्चात मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रकृती बरी नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे. मल्टिसिस्टम इंफ्रामेट्री सिंड्रोम इन चिल्ड्रनची (एमआयएससी) या आजाराकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा हा आजार बळावू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजाराचे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेत असल्याचे सांगण्यात येते.

ही आहेत लक्षणे

* मुलांना तीन दिवसांहून अधिक काळ जास्त ताप असणे

* पोटदुखी, उलट्या होणे

* सर्दी व मानेत दुखणे

* डोळे, जीभ व होठ लाल होणे

* हाता-पायांवर सूज येऊन त्वचेची कातडी निघणे

* सुस्तपणा येणे

* श्वासोश्वासाची समस्या

10 लाखात 14 असे प्रमाण

एमआयएससी हा 10 लाखामध्ये 14 जणांना होऊ शकतो. तो कोरोना पश्चात होणारा अजार आहे. मुळात कोरोना होऊनये यासाठी सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर ही त्रिसुत्री पाळणे हाच सर्वात मोठा प्रतिबंध आहे. यानंतरही कोरोनातून बाहेर पडलेल्या लहान मुलांवर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसताच तज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू करावेत.

- डॉ. गाजरे, बालरोगतज्ञ, जिल्हा रूग्णालय

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com