दुषित पाण्यामुळे साथरोगांचा धोका: भाजपचा आंदोलनाचा इशारा

दुषित पाण्यामुळे साथरोगांचा धोका: भाजपचा आंदोलनाचा इशारा

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

शहरात नगरपरिषदेकडून (nagar parishad) जंतुयुक्त, गाळमिश्रीत दुषित पाणीपुरवठा (Contaminated water supply) होत असल्याने जनतेचे आरोग्य (health) धोक्यात आले आहे. शहरात साथरोगांनी डोके वर काढले असून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भाजपच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे (Administrator Vivek Dhande) यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत भाजप शिष्टमंडळाने (BJP delegation) दिलेल्या निवेदनात (memorandum) म्हटले आहे की, नगरपरिषदेकडून (nagar parishad) शहरात गाळयुक्त, जंतुयुक्त दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांना पोटदुखी (Abdominal pain), जुलाब (Diarrhea) आदी आजारांचा प्रादुर्भाव होत असून शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. येत्या आठ दिवसात शुद्ध पाणीपुरवठा (Clean water supply) न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन (agitation) छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश शिदे, शहराध्यक्ष उमेश उगले, राजेश बनकर, भाऊराव निकम, दत्ताराज छाजेड, राजाभाऊ गांगुर्डे, राजू आहेर, किरण गवळी, प्रकाश थोरात, कृष्णा त्रिभुवन आदी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून गिरणा धरणातून पाणीपुरवठा होत नसून दहेगांव धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.

नगरपरिषदेकडे पाणी शुद्धीकरणासाठी (Water purification) यंत्रणा उपलब्ध नसल्याने नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, पोटदुखी यासारख्या आजाराने नागरिकांना ग्रासले आहे. यास्तव पुर्वीप्रमाणे गिरणा धरणातून (girna dam) शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी नगरपरिषदेने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com