उड्डाण पुल ओलांडताना अपघाताचा धोका

उड्डाण पुल ओलांडताना अपघाताचा धोका

नवीन नाशिक । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल ओलांडणे अत्यंत धोकेदायक असतानाही उड्डाणपुलावर खाजगी वाहने थांबत असल्यामुळे महामार्ग ओलांडण्याचा धोका अनेक प्रवासी पत्करत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रशासनाने या प्रश्नी डोळेझाक केली असल्याने संबंधितांनी खासगी वाहनांवर कारवाई करावी म्हणजे येथील अपघातांना आळा बसेल असे येथील जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत माहिती अशी की नवीन नाशिक व इंदिरानगर या दोनही परिसराच्या मधुन महामार्ग गेला असून उड्डाणपुलाचे काम झाले आहे त्यामुळे शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांची सोय झाली आहे परंतु गेल्या काही वर्षात उड्डाणपुलावर अनेक प्रवासी मुंबईकडे तसेच धुळे व जळगाव या भागात जाण्यासाठी थांबतात व येथून मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहतूक सुरू आहे त्यामुळे हे प्रवासी महामार्ग ओलांडण्याचा धोका पत्करतात असेही यापूर्वी स्पष्ट झाले आहे.

नवीन नाशकातून इंदिरानगर कडे जाण्यासाठी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, लेखानगर, राणेनगर व पाथर्डी फाटा या भागात भुयारी मार्ग बांधण्यात आलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हे दोघे ठार झाले होते त्यामुळे उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले गेले.

प्रशासना तर्फे स्टेट बँक चौक व दिपाली नगर येथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. पण उड्डाणपुलावरील रस्ता ओलांडण्याचे प्रमाण प्रवाशांचे जास्त आहे. नवीन नाशिक व इंदिरानगर या परिसरातील अनेक प्रवासी उड्डाणपुलावर येऊन थांबतात व येथून खाजगी वाहनाने प्रवास करतात त्यामुळेही अपघाताची भीती आहे. पोलीस प्रशासनाने त्वरित खासगी वाहनांवर व उड्डाणपूल ओलांडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशानी केली आहे .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com