जांभूळ
जांभूळ
नाशिक

म्हणून जांभूळ खातेय ‘भाव’...

वातारण बदलाचा फटका

Gokul Pawar

Gokul Pawar

लखमापूर । Lakhmapur

ग्रामीण भागात फळांचा राजा आंबा फळाचा हंगाम संपत आला असून, सध्या संपूर्ण भागातून जांभळाला वाढती मागणी असल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात फळांची मागणी ग्राहकांकडून होते. यंदा फळांचा राजा आंबा फळाला चांगली मागणी होती, मात्र वातावरण बदल तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे आंब्याची चव आंबट झाली आहे. आंबा हंगामाचा शेवट होत असताना ग्राहक वर्गातून पौष्टिक असलेल्या जांभळाला वाढती मागणी आहे.

परंतु जांभळाला देखील वातावरण बदलाचा फटका बसला असून बाजारपेठेत अत्यंत कमी प्रमाणात येत आहे. यंदा ग्राहकांना जांभूळ कमी खायला मिळेल, असे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाला की जांभळाच्या झाडाला चांगला बहर येतो, परंतु यंदा मात्र दिवसेंदिवस वातावरणातील बदलामुळे जांभुळाला बहर कमी आल्याने फळ कमी प्रमाणात आली. त्याचा परिणाम बाजारपेठेत जांभूळ फळ कमी प्रमाणात विक्रीस येत आहेत. बाजारपेठेत जांभूळ कमी अन मागणी वाढलेली दिसत आहे. यंदा जास्त भावाने ग्राहक वर्गाला जांभूळ फळ खरेदी करावी लागणार, असे चित्र पहायला मिळत आहे.

मागील वर्षी जांभळाची किलोची जाळी साधारणतः ५०० ते ६०० रुपयांपर्यंत विकली गेली. यंदा मात्र याच फळाची २० किलोची जाळी ७०० ते ९०० रुपयांत विकत घ्यावी लागणार, असे चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जांभळाला मागणी व दरही वाढणार आहे.

दरवर्षी जांभळाचे मोठे उत्पन्न घेतो, परंतु यंदा मात्र झाडाला फळ धारणा कमी झाल्यामुळे फक्त 20 ते 30 टक्केच फळ आमच्या हाती आले आहे. यंदा जांभूळ पिक कमी पप्रमाणात आल्याने शेतीचे नगदी भांडवल गेले आहे.

-कोंडाजी पिंगळे, जांभूळ उत्पादक शेतकरी

Deshdoot
www.deshdoot.com