Video : ऋषीपंचमीनिमित्त गोदाकाठी महिलांचा मेळा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज ऋषीपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक महिलांनी गोदाकाठी ऋषींची मनोभावे पूजा केली. यावेळी महिलांनी गोदावरीत स्नान केले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून महिलांची मोठी गर्दी गोदातीरी झाल्याचे दिसून आले.

आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते. गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com