
नाशिक | प्रतिनिधी Nashik
महन्महनीय कृष्णाजी माउली श्रीक्षेत्र जायखेड़ा यांच्या असीम अशा उर्जेतुन निर्मिल्या गेलेल्या पायी दिंडी सोहळ्यास या वर्षी 70 वर्ष पूर्ण झालेत.त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रे निमित्त त्यांच्या दिंडी सोहळ्यात यावर्षी 1900 वारकरी समाविष्ट आहे.आज दुपारी ब्रह्मा व्हॅलीच्या प्रांगणात नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्रद्धास्थान यशोदा अक्का यांच्या समवेत शांतिसागर जयरामजी बाबा,आचार्य हरि भाऊ, विश्वनाथ महाराज, विनाप्रमुख नामदेव महाराज होते, रिंगन सोहळ्याचे पूजन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय धीवरे जॉइंट कमिशनर आयकर विभाग (नाशिक )माजी गृहमंत्री यांचे स्वीय सहायक सुशील पाटील, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे विश्वस्त संतोष कदम, निवृत्तिनाथ महाराज मंदिराचे विश्वस्त व ह.भ.प.नवनाथ महाराज व ब्रह्मा व्हॅलीचे संचालक रजाराम पानगव्हाने यांच्यासह अनेक मान्यवर या रिंगण सोहळ्यास उपस्थित होते.
रिंगण सोहळ्यात सुरवातीस महन्महनीय कृष्णाजी माउली यांच्या पालखीला सलामी देण्यात आली व नंतर सर्व वारकरी बांंधवांनी 'ज्ञानोबा माउली तुकाराम' च्या गजरात वेगवेगळ्या प्रकारच्या पाउल्या खेळल्यात,तदनंतर उपस्थित समस्त वारकरी महिलांनी रिंगण खेळून आनंद लुटला,त्यात शालेय बालक ही समाविष्ट होते, जामदे येथील माऊलीजिचे शिष्य फासे पारधी च्या वारकरी बांंधवांनी व भगिनी यांनी रिंगनाचा आनंद लुटला व सर्वात शेवटी माउलींच्या अश्वाचे रिंगण झाले व माउलींच्या पालखींची आरती होऊन रिंगण सोहळ्याची सांगता झाली, रिंगण सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी माउली नातू धनंजय महाजन(आबा) व त्यांच्या समवेत त्यांच्या 30 गुरू बांध होते.