रिंगरोड रखडल्याने पंचवटीचा विकास खुंटला

रिंगरोड रखडल्याने पंचवटीचा विकास खुंटला
देशदूत न्यूज अपडेट

पंचवटी | वार्ताहर | Panchavati

पंचवटी परिसराला (Panchavati area) रिंगरोडचे (Ringroad) मोठे जाळे आहे. शहराच्या आजूबाजूला लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत असताना अपूर्ण असलेल्या रिंगरोडमुळे परिसराचा विकास खुंटला आहे...

या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी अपूर्ण असलेल्या रिंगरोडची पाहणी करून तत्काळ हे रस्ते पूर्ण करावेत, अशी मागणी पंचवटी युवक विकास समितीच्या (Panchavati Yuvak Vikas Samiti) पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव ( Municipal Corporation commissioner Kailas Jadhav) यांच्याकडे केली आहे.

आडगाव (Adgaon), मखमलाबाद (Makhmalabad), म्हसरूळ (Mhasrul) या भागांत लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. या परिसरातील बाह्य रिंग रोड झाले असले तरी त्यांचे रुंदीकरण रखडलेले आहे.

शिवाय या रिंगरोडला जोडणारे अंतररिंग रोड अपूर्ण आहेत. एका बाजूला स्मार्ट सिटी (Smart City) आणि स्मार्ट रोडच्या (Smart Road) नावाखाली चांगले रस्ते तोडण्यात येत आहेत.

कोट्यावधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा ज्या ठिकाणी गरज आहे तेथील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. असे झाले तरच खऱ्या अर्थाने स्मार्ट शहराचे स्वप्न साकार होईल.

त्यामुळे मनपा प्रशासनाने पंचवटी परिसरासह नाशिक शहरातील (Nashik City) अंतर व बाह्य रिंगरोडचे काम पूर्ण करावे जेणेकरून या परिसराच्या विकासाला चालना मिळेल. शिवाय मनपा प्रशासनाच्या बांधकाम परवानग्या, घरपट्टी, पाणीपट्टी या माध्यमातून उत्पन्नात भर पडेल अशी मागणी पंचवटी युवक विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com