
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरांतर्गत सूरक्षित वाहतूक (Safe transportation) करण्यासाठी राज्य शासनाने (state government) रिंग रोडचा (Ring Road) प्रस्ताव मंजूर केला असून, त्यादृष्टिने आरेखन नियोजन करण्याचे काम मनपाच्या माद्यमातून केले जाणार आहे.
या बाह्य रिंग रोडला (Outer Ring Road) अंदाजे 10 हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता असल्याने निधी (fund) उभारणीचा नवा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर शहराला रिंग रोड (Ring Road) निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मागिल सिंहस्थात शहरांतर्गत रिंग रोड उभारण्यात आले होते. मात्र या नविन प्रस्तावात शहराच्या बाहेरील भागातून जाणारा रिंग रोड उभारण्याला राज्य शासनाद्वारे मान्यत देण्यात आलेली आहे.
महानगरपालीकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत केवळ पूण्यातच 160 किलोमिटर लांबीचा बाह्य रिंग रोड (Ring Road) उभारण्यात येत आहे. त्यापाठोपाठ बाह्य रिंगरोड केवळ नाशिकलाच (nashik) उभारला जाणार आहे. या रिंग रोडची लांबी सुमारे 60 किमी असण्याची शक्यता आहे. हा रिंग रोड चौपदरी असण्याची शक्यता असून, या रिंग रोडसाठी अंदाजे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता असून,
त्यात काही ठिकाणी जागा मोबदला देून अधिग्रहीत करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी 4-5 टीडीआर देऊन भूमी अधिग्रहण (Land acquisition) करता येणे शक्य आहे. शासनाच्या माध्यमातून यासाठी लागणारा निधीची उभारणीचा नवा प्रश्न उभा राहण्याची शक्यताआहे. मनपाच्या माध्यमातून या बाह्य रिंगरोड उभारणीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे.