स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन
नाशिक

स्वातंंत्र्यदिन, मान्सूनमुळे ऑफरची ‘रिमझिम’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

टाळेबंदी आणि कोविडची भिती दूर सारुन ग्राहक पून्हा बाजारपेठ यावा, पावसाळ्यापूर्वी जुना स्टॉक काढून सण-उत्सवासाठी नवीन माल भरावा आणि स्वातंत्र्यदिनाचे औचित्य या तिहेरी कारणांनी बाजारपेठेत ग्राहकांसाठी भर पावसाळ्यात योजना,ऑफर सूटची रिमझिम बरसात पाहायला मिळात आहे. अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 40 टक्कयांपर्यंत सूट देऊ केल्या आहेत. मोबाईल, टीव्ही, वॉशिंग मशिन, आटाचक्की यासह होजियारी, पादत्राणांवरही योजना, सवलत देण्यात येत आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत हळूहळू चैतन्य येत आहे. स्थािनिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करुन नियोजित वेळेत बाजारपेठा खुल्या असून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ग्राहकांसाठी विविध योजना, सूट किंवा ऑफर देऊ केल्याने शुक्रवारी(दि.14) बाजारपेठेत चैतन्य दिसून आले. दोन अडिच महिन्याच्या काळात टाळेबंदी आणि नंतर कोविडची भिती यामुळे ठारविक दुकाने वगळता अन्यत्र ग्राहकांनी पाठ फिरवली. मात्र ग्राहकांना पून्हा वळवण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून व्यापारी, व्यावसायिकांना सूट, योजना जाहीर केल्या.

शहरात मेन रोड, महात्मा गांधी रोडवर सकाळी आणि दुपारनंतर भरपूर गर्दी दिसून आली. अनेक व्यावसायिकांच्ंया दुकानाबाहेर सूट, मान्सूम सेल असे फलक दिसले. पावसाच्या दमदार पुनरागम झाल्याने व्यावसायिक सुखावले. एम.जी रोडवरील एका दालनात ब्रॅण्डेड रेनकोटवर 10 टक्के सूट देण्यात येत होती तर काही चपला, बूट दुकानात पादत्राणांवर 40 टक्के सूट देण्यात आली.

तिसर्‍या लॉकडाऊनमध्ये बाजारात होजिअरी आणि डेली वेअर्सला मोठी मागणी वाढली. ग्राहकी वाढण्यासाठी होजियारीच्या कुठल्याही तीन उत्पादनांच्या खरेदीवर 10 टक्के सूट देण्यात येत असल्याची माहिती विद्या विकास सर्कल, गंगापूररोडवरील जॉकी उषा इंटरप्रायझेजसचे संचालक महेश सोनवणे, कुणाल लवेरी यांनी दिली.

20 टक्के ऑफर

आमच्या कॉलेज रोड नंदन चोैक मॉडेल कॉलनी येथील क्लासिक इंटेरियर अत्याधुनिक दालनात अंतर्गत सजावटीसह सिलिंग आणि देवघरांचे विविध कलात्मक प्रकार येथे उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यदिन तसेच दालनाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक उत्पादनांवर 20 टक्के ऑफर देत आहोत. - - -नेमीचंद लोहार, संचालक क्लासिक इंटेरियर.

मोबाईल, टीव्ही, फ्रिजवर सूट

सोनी टीव्ही वर 30 टक्क्यांपर्यत सूट शिवाय क्रेडिक कार्ड खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देत आहोत. आटाचक्की, सेलफोनवरही मॉडलप्रमाणे सूट देण्यात येत आहे. फ्रिज, वॉशिंग मशिन खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि 15 हजारांचा स्मार्ट टीव्ही केवळ 9 हजार 990 रुपयांना विकत घेता येणार आहे. 17 ऑगस्टपर्यंत योजना सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com