रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासीच मिळेना..!

टाळेबंदीचा फटका
रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासीच मिळेना..!

नाशिक | Nashik

दुसऱ्या लाटेतील करोनामुळे सर्वसामान्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे नियमित प्रवाशांवर दररोजचा व्यवसाय अवलंबून असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांना भाडे मिळणे कठीण झाले आहे.

खासगी क्षेत्रातील कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करतो. मात्र, वर्क फ्रॉम होममुळे खासगी कर्मचारी कमी झाले आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना सध्या बोटावर मोजण्याइतके प्रवासी मिळत आहेत. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून घर चालविणे रिक्षा, टॅक्सी चालकांना अवघड हाेत आहे.

गेल्या वर्षी करोना आणि लॉकडाऊनमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांचे जगणे मुश्किल झाले होते. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतुक सुरू झाली होती. त्यानंतर रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासी मिळणे सुरू झाले.

यावेळी रिक्षा, टॅक्सी चालकांनाच्या हाती पैसे येऊ लागले होते. मात्र पुन्हा प्रवासावर निर्बंध आल्याने प्रवासी संख्या कमी झाली आहे. व्यवसायातून २० ते ३० टक्क्यांहून कमी उत्पन्न मिळत आहे. आता १२ तास काम करून सुध्दा २०० ते ३०० रुपये हाती येणे कठीण झाले आहे. अनेक रिक्षा, टॅक्सी चालक गावी गेल्याने किंवा अन्य काम करत आहे.

परिणामी रस्त्यावर फिरणाऱ्या रिक्षा, टॅक्सींची संख्या कमी झाली आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना महिना १० हजार भत्ता देण्यात यावा. त्याची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आहे.

मात्र त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. बाहेर राज्यातील ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांचे उत्पन्न अत्यल्प झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com