चारचाकीच्या धडकेत रिक्षातील प्रवासी ठार

चारचाकीच्या धडकेत रिक्षातील प्रवासी ठार

नाशिक । Nashik

चारचाकीने रिक्षाला (rickshaw) जोरदार ठोस दिल्याने रिक्षातील प्रवाशाला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात (Canada Corner area) घडली आहे...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.१३) रात्री अकरा वाजेच्या सुमारास रिक्षा क्र. (एम. एच. १५ ए.क्यू.०८४२) जात असताना संशयित (Suspect) नितेश देशीराम चव्हाण (Nitesh Deshiram Chavan) यांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी भरधाव वेगाने चालवून रिक्षाला जोरदार ठोस मारून अपघात (Accident) केला. या अपघातात रिक्षातील प्रवासी बापू कुमार (bapu kumar) यांना गंभीर दुखापत (Injury) झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, संशयित चव्हाण हा या अपघाताची खबर न देता गाडी सोडून निघून गेल्यामुळे त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल (case Filed) करण्यात आला असून पुढील तपास वपोनी साजन सोनवणे (Sajan Sonawane) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भटू पाटील (Bhatu Patil) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com