पावसाअभावी भात पीक धोक्यात; बळीराजा चिंताग्रस्त

पावसाअभावी भात पीक धोक्यात; बळीराजा चिंताग्रस्त

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिल्याने भात पिकाची (Crops) परिस्थिती बिकट बनली आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले हे पिके कसे येणार? अशी चिंता बळीराजा व्यक्त करीत आहे....

दारणा (Darna) पट्ट्यातील नाणेगाव, शेवगेदारणा, वंजारवाडी, दानवाड, राहुरी, शेवगेदारणा, संसारी या भागात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

अतिशय उत्तम असे भात पीक (Rice Crop) या भागात दरवर्षी निर्माण केले जाते, यंदा भाताची लागवड वेळवर झाली असली तरी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे.

त्यामुळे ऐन मोसमात असलेले हे पीक हो कोमजत आहे. शेतकऱ्यांनी या पिकासाठी आत्ता विहिरीचे (Well) पाणी वापरास सुरुवात केली आहे. परंतु पावसाचे पडणारे नैसर्गिक पाणी व त्यामुळे या पिकाची होणारी नैसर्गिक वाढ हे प्रमाण कुठेतरी कमी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून (Farmers) बोलले जात आहे.

भात पिके प्रामुख्याने जास्त पावसाच्या भागात घेतले जाते. त्यात इगतपुरी तालुका (Igatpuri Taluka) हा आघाडीवर असून नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गिरणारे (Girnare) भागातही मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जाते.

इगतपुरी लगतच्या लोहशिंगवे, वंजारवाडी, भगूर व दारणा पट्ट्यामध्ये ही विविध प्रकारच्या भाताची लागवड करून व्यापारी शेती करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. विहिरीचे पाणी सिंचनाद्वारे भरले तरी ज्या प्रमाणात या पिकाची वाढ होणे अपेक्षित असते ती होताना दिसत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी यंदा हे पीक कसे येते याकडे डोळे लावून बसला आहे.

दरवर्षी आम्ही आमच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे बियाणे आणून त्याची लागवड करतो. आरोग्यासाठी उत्कृष्ट असलेला काली मुच या भात पिकाची यंदा लागवड केलेली आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने सिंचनाद्वारे पाणी दिले जात आहे. त्यामुळे या पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर किती प्रमाणात परिणाम होईल हे बघावे लागेल

- नितीन गिरी, शेतकरी, नानेगाव.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com