वजनात फसवणुक करणाऱ्या 'त्या' व्यापार्‍याचा परवाना रद्द

वजनात फसवणुक करणाऱ्या 'त्या' व्यापार्‍याचा परवाना रद्द

पिंपळगाव बसवंत। प्रतिनिधी Pimpalgaon Baswant

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pimpalgaon Agricultural Produce Market Committee) आवारात टोमॅटो (Tomato) खरेदी करणारा एम.एम. वर्मा नावाचा व्यापारी वजन काट्याच्या खालच्या बाजूने दगड लावून गेल्या कित्येक दिवसापासून शेतकर्‍यांची (Farmers) लूट करीत होता.

हा प्रकार शेतकर्‍यांनी उघडकीस आणून मोबाईलवर त्याचे शुटिंग करून तो सर्वत्र व्हायरल (Viral) केल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची तत्काळ दखल घेत बाजार समिती सभापति आमदार दिलीप बनकर (Market Committee Chairman MLA Dilip Bankar) यांनी संबंधीत व्यापार्‍यास टोमॅटो खरेदीची बंदी घातली आहे.

बाजार आवारात टॉमॅटो खरेदीतील गैरप्रकारासंदर्भात शिवरे (ता. चांदवड) येथील शेतकरी योगेश बस्ते यांनी बाजार समितीचे सचिव बाजारे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. परिणामी सचिव बाजारे यांनी या प्रकरणा संदर्भात सभापति व संचालक मंडळाशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार या सगळ्या प्रकाराची चौकशी करून सभापति आमदार दिलीप बनकर यांनी संबंधित व्यापार्‍यास टोमॅटो खरेदीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला. येथील बाजार समितीत अनेक परप्रांतीय व्यापारी टोमॅटो खरेदी करतात. वेगवेगळ्या प्रकारे शेतकर्‍यांची लूट करण्याचा प्रयत्न करतात. या घटनेतून सर्वांवर वचक बसण्यासाठी बाजार समितीने वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची निर्मिती करून सर्वच व्यापार्‍यांवर एकप्रकारे वचक बसविण्याचा प्रयत्न केला.

या सार्‍या प्रकारामुळे पिंपळगाव बाजार समितीत होणारे गैरव्यवहार (Abuse), गैरप्रकार यांना मोठा आळा बसणार आहे. बाजार समितीचे भरारी पथके वजनकाट्यांची तपासणी देखील करणार असल्याने व्यापार्‍यांवर चांगलाच चाप बसणार आहे. टोमॅटोचे भाव कोसळत असतांना व्यापार्‍याकडून असे कृत्य होणे खेदाची गोष्ट आहे. यापुढे दोषी आढळणार्‍या व्यापार्‍यांचे परवाने रद्द करून त्यांची गच्छंती होणार असल्याने गैरव्यवहाराला आळा बसणार असल्याने या मोहिमेचे शेतकर्‍यांकडून स्वागत होत आहे.

Related Stories

No stories found.