दहिवाळ पाणी योजनेचे पुनरूज्जीवन

जलजीवन मिशन अंतर्गत 23 कोटींचा निधी
दहिवाळ पाणी योजनेचे पुनरूज्जीवन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील दहिवाळसह (Dahiwal) 26 गाव पाणीपुरवठा योजनेच्या (Water supply scheme) पुनरूज्जीवनासाठी (Revival) आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांचे प्रयत्न यशस्वी ठरले असून

या योजनेच्या पुनरूज्जीवनासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत (Jaljivan mission programs) 22 कोटी 90 लाख रूपयांच्या निधीस (fund) राज्याचे पाणीपुरवठा (Water supply) व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Sanitation Minister Gulabrao Patil) यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी डॉ. रविंद्र भराटे (Dr. Ravindra Bharate) यांनी योजना पुनरूज्जीवनाच्या सुधारीत अंदाजपत्रक (Budget) व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिल्याचे पत्र दिले असून ते ना. पाटील यांच्या हस्ते आ. कांदे यांना प्राप्त झाले आहे. मालेगाव (malegaon) तालुक्यातील दहिवाळसह 26 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सन 2008 मध्ये गिरणा धरणातून (girna dam) योजना उभारण्यात आली आहे.

परंतू गेल्या 13 वर्षात या योजनेच्या जलवाहिनीच्या देखभाल-दुरूस्तीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने विविध गावांना पाणीटंचाईच्या समस्येचा गेल्या काही वर्षांपासून सामना करावा लागत आहे. खंडीत पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा तसेच योजनेतील तांत्रिक बिघाडासह पाणी उपसा करणारे वीजपंप, पाईपलाईन, वारंवार होणारे बिघाड अशा विविध अडचणींमुळे दहिवाळसह 25 गावांना नियमित पाणीपुरवठा होण्यात व्यत्यय येत होता.

त्यामुळे योजनेतील गावांना धरणात मुबलक पाणी असूनही दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. योजनेची दुरूस्ती किंवा पुनरूज्जीवन करणे गरजेचे आहे, असे आ. कांदे यांना ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानांतर्गत जनतेने निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार आ. कांदे यांनी योजनेचे पुनरूज्जीवन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत मागणी केली होती.

त्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचेही सहकार्य लाभले. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेच्या पुनरूज्जीवनासाठी 22 कोटी 90 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेस दहिवाळसह कळवाडी जि.प. गटातील खलाणे, रोंझाणे, सिताणे, अजंदेपाडा, रोझे, पाडळदे, शेदुर्णी, नाळे, साजवाळ, चिखलओहोळ, गुगुळवाड, पळासदरे, देवारपाडे आदी गावांचा समावेश असून पुनरूज्जीवन कार्यक्रमात जलवाहिनीवरील यंत्रसामुग्री तसेच गिरणा धरणावर बसविण्यात आलेले वीजपंप बदलण्यात येणार आहे.

गिरणा धरण ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतची 21 कि.मी. लोखंडी जलवाहिनी देखील बदलली जाणार आहे. त्यापुढील सिमेंट पाईप बदलून एच.डी.पी.ई. पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. याशिवाय सर्व गावांतर्गत पाणी वितरण व्यवस्था नव्याने करण्यात येणार आहे.

26 गावांपैकी दहिवाळ, माल्हणगाव, रोझे, पाडळदे येथे दोन तर शेरूळ, गिगाव, बोधे, शेंदुर्णी, साजवाळ, चिखलओहोळ, गुगुळवाड, देवारपाडे येथे एक जलकुंभ उभारण्यात येणार आहे. या कामांचा कार्यारंभ आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याने दहिवाळसह 26 गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या संकटातून दिलासा लाभणार आहे.

नांदगाव मतदार संघात ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत नागरीकांनी पाणीटंचाईच्या समस्या मांडल्या होत्या. त्यामुळे दहिवाळसह 26 गाव पाणीपुरवठा योजनेतील समस्यांचा अभ्यास करून या योजनेचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असता जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 22 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येईल.

आ. सुहास कांदे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com