निळवंडे प्रकल्पाचा आढावा

निळवंडे प्रकल्पाचा आढावा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

अकोले तालुक्यातील Akole Taluka निळवंडे धरणाच्या Nilvande Dam लाभक्षेत्रात येणार्‍या सिन्नर तालुक्यातील सहा गावांतील शेतकर्‍यांची बैठक आमदार माणिकराव कोकाटे MLA Manikrao Kokate यांच्या अध्यक्षतेखाली सायाळे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ.कोकाटे यांनी प्रकल्पाचा आढावा Project Review घेऊन शेतकर्‍यांचे समस्यांचे निरसन केले.

निळवंडे प्रकल्पांतर्गत येणार्‍या तालुक्यातील पूर्व भागातील गावांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील पाथरे खुर्द, मलढोण, वारेगाव, सायाळे, दुसंगवाडी, कहांडळवाडी या सहा गावातील सुमारे 1350 हेक्टर क्षेत्राला निळवंडे धरणाच्या पाण्याचा सिंचनासाठी लाभ होणार आहे. सध्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम प्रगतीपथावर असून जून 2022 अखेरपर्यंत मुख्य कालव्याची कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर वितरिकांची कामे हाती घेण्यात येणार आहे.

निळवंडे प्रकल्पाचे काम मार्गी लागून कालवे प्रवाही झाल्यास पोटचार्‍यांच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील अतिशय दुष्काळी असलेल्या पूर्व भागातील या सहा गावांना शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार असल्याने नागरिकांचे लक्ष प्रकल्प पूर्णत्वाकडे लागले आहे. पोटचार्‍यांची कामे तत्काळ मार्गी लागून पूर्व भागातील ही दुष्काळी गावे कायमस्वरूपी बागायती व्हावी यासाठी आमदार कोकाटे यांनी पाठपुरावा के ला होता. याच पार्श्वभूमीवर या आढावा बैठकीत आ. कोकाटे यांनी अधिकार्‍यांकडून या कामांची नेमकी सद्यस्थिती जाणून घेत शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी आपले प्रश्न व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाऊन पुर्व भागातील शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न मिटणार असल्याचे आश्वासन आ. कोकाटे यांनी केले. यावेळी निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने, उपकार्यकारी अभियंता असिफ शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, कोपरगाव पं. स. सदस्य बाळासाहेब रहाणे, पं.स. सदस्य रवींद्र पगार, माजी सभापती राजेंद्र घुमरे, वावीचे माजी सरपंच विजय काटे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com