विभागीय आयुक्तांकडून विधान परिषद निवडणुकीचा आढावा

विभागीय आयुक्तांकडून विधान परिषद निवडणुकीचा आढावा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणुकीचे (election) मतदान (voting) ३० जानेवारी रोजी होत आहे. मतदान प्रकिया (Voting process) सुरळीत होण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी पूर्व तयारी आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरण.डी. (Collector Gangatharan.D.), जिल्हाधिकारी जलज शर्मा धुळे, उपायुक्त (महसूल) संजय काटकर, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, उपायुक्त (रोहयो) प्रज्ञा बडे- मिसाळ व इतर अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, उप जिल्हाधिकारी धुळे अंतुरलीकर, जळगावचे तुकाराम हुलावळे उपस्थित होते.

गमे यांनी मतपेट्यांची उपलब्धता, मतपत्रिका छपाई (Ballot printing) याचा आढावा घेतला. तसेच निवडणूक (election) काळातील वाहनाबाबतचे नियोजन, सूक्ष्म निरीक्षक नियुक्त्या (Micro Inspector Appointments) तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेबाबत नियोजन, या बाबतचा आढावा त्यांनी घेतला. निवडणुक काळात सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी,असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com