वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक

वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वैद्यकीय महाविद्यालय ( Medical College ) संदर्भातील जागा वितरणाबाबत शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका ( NMC )व इमारत बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून येत्या आठवड्यात सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal )यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Maharashtra University of Health Sciences )वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थेच्या कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

दरम्यान, या विद्यालयाच्या इमारतीचे डिझाईन नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. तसेच त्याअंतर्गत सर्व अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध असाव्यात, अग्निशामन यंत्रणा, स्प्रिंक्लर, हिरवळ या बाबींचा समावेशदेखील नवीन इमारतीत करण्यात यावा, याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल.

याबाबतचे नियोजन तयार करून येत्या आठ दिवसांत सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, डेप्युटी रजिस्टार डॉ. एस. एच. फुगरे आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com