नांदगावला केंद्रीय राज्यमंत्र्यांची आढावा बैठक

नांदगावला केंद्रीय राज्यमंत्र्यांची आढावा बैठक

नांदगाव। प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव तालुक्यात Nandgaon केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार Union Minister of State Dr. Bharti Pawarयांनी कृषी, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभागाचा आढावा Review Meeting घेतला. तसेच अधिकार्‍यांना धारेवर धरत कामातील दिरंगाई दूर करण्याचे आवाहन केले. विलंबाने होत असलेल्या कामांबद्दल नाराजी व्यक्त केली.निष्काळजी करणार्‍या अधिकार्‍यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

बैठकीत, आरोग्य, कृषी, महावितरण, पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि विभागांचा आढावा घेताना पवार यांनी नांदगाव तालुक्यातील अधिकारी वर्गाने एकमेकांशी सुसंवाद साधण्याची मानसिकता ठेवून मानवतेच्या दृष्टीने विचार करून जनतेची कामे करावी जेणेकरून रात्रीची झोप सुखाची येईल असे काम करा... अशा संतप्त भावना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी व्यक्त केल्या.

यावेळी नांदगाव तालुक्यात इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी कमी असल्याचे निदर्शनास आल्याने लाभार्थींची आकडेवारी कमी म्हणजे काम कमी आहे, असा आक्षेप खा. पवार यांनी नोंदविला.

बैठकीत, तहसिलदार सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृषी अधिकारी जगदिश पाटिल, पोलिस निरीक्षक अनिल कातकाडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी राहुल कुटे, मनमाड मुख्याधिकारी मुंढे, शहराध्यक्ष उमेश उगले, यांच्यासह भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस संजय सानप, माजी नगरसेवक राजीव धामणे, गणेश शिंदे, मुस्ताक शेख, सजन कवडे, नितीन पांडे, मनोज शर्मा, बबन मोरे, आहिरे, सरोदे यांच्यासह तालुक्यातील विविध शासकिय अधिकारी, नागरिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आढावा बैठकिसाठी, उपस्थित शेतकरी, कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक यांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने व माईक सिस्टीम सदोष असल्याचे चित्र होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com