त्र्यंबकमधील अनधिकृत कामे महसूल विभागाच्या रडारवर !
file photo

त्र्यंबकमधील अनधिकृत कामे महसूल विभागाच्या रडारवर !

ब्रम्हगिरी खोदकाम प्रकरण

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबक मधील ब्रह्मगिरीच्या प्रकरणानंतर आता महसूल विभाग अशा कामांचा शोध घेणार आहे. त्याचबरोबर कारवाई देखील करणार आहे.

दरम्यान त्र्यंबक येथील ब्रह्मगिरी ला सुरुंग लावण्याचे काम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटल्या. सुजलाम सुफलाम असलेल्या त्र्यंबक नगरीला अलीकडच्या काळात पोखरण्याचर काम सुरू आहे. अंजनेरी पासून ते त्र्यंबकेश्वर पर्यंतचा पट्ट्यात अनेक खाजगी संस्था, जागा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी हवाहवासा निसर्ग असलेल्या त्र्यंबक परिसरात आता सिमेंटची जंगल उभी राहिली आहेत.

दरम्यान ब्रम्हगिरी प्रकरणानंतर आता पर्यावरण मित्र तथा शहर वासीयांना जाग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वीच अंजनेरी डोंगरावर रस्ता होत असल्याने आंदोलने झाली. त्यानंतर खुद्द आदित्य ठाकरे यांनी दाखल घेत अंजनेरी रस्ता कामाला थांबा दिला.

त्याचप्रमाणे ब्रम्हगिरीसाठी देखील 'सेव्ह ब्रम्हगिरी' मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे ब्रम्हगिरी प्रकरणात लक्ष घालतील का? असा सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे. त्र्यंबक महसूल विभाग आता डोंगर परिसरात कुठे बेकायदेशीर कामे सुरू आहेत का याचा शोध घेत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जी कामे सुरू आहेत, त्यावर कारवाईची मागणी स्थानिकांमधून होत आहे. याचबरोबर वन विभागानेही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

एकूणच अंजनेरी काय अन ब्रम्हगिरी काय? दोन्हीही निसर्ग सौंदर्यात भर घालणारे आहेत. त्यामुळे त्याच जतन होणं काळाची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com