सिन्नर : निवृत्त एसटी कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू
नाशिक

सिन्नर : निवृत्त एसटी कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर | Sinnar

तालुक्यातील भोकणी येथील 58 वर्षीय पुरुषाचा (दि.१९) आज पहाटे पाच वाजता नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

दोन महिन्यांपूर्वी एसटीच्या सिन्नर आगारातून चालक म्हणून निवृत्त झालेल्या या व्यक्तीला दोन-तीन दिवसांपूर्वी डायलिसिस साठी एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. कालच त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.

तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यातील करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 22 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com