सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍याचे पिस्तुल लंपास

सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍याचे पिस्तुल लंपास

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍याचे Retired military officer सुमारे एक लाख रुपये किमतीचे पिस्तोल अज्ञात चोरट्याने बॅगमधून चोरुन stolen by unknown thieves नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात Upnagar police station अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद कुमार यादव रा. माऊली निवास अपार्टमेंट, रूम नंबर 20, लवटेनगर, जय भवानी रोड, नाशिकरोड हे आर्मीचे सेवानिवृत्त अधिकारी असून यादव ते भाजीपाला खरेदीसाठी बिटको हॉस्पिटलजवळ भाजी मार्केटमध्ये गेले होते. भाजीपाला खरेदी करून ते आपल्या घरी जात असताना जय भवानी रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ थांबले. त्या ठिकाणी सैन्यभरतीसाठी काही अनोळखी मुले आले होते. त्यांच्यासोबत यादव यांनी चर्चा करून विचारपूस केली व नंतर ते घरी गेले.

घरी आल्यावर त्यांनी बॅगमधील भाजीपाला बाहेर काढला व बॅगमध्ये ठेवलेले पिस्तोल बघितले असता त्यांना ते दिसून आले नाही. त्यामुळे यांनी शोधाशोध केली. परंतु पिस्तोल कुठे सापडले नाही. आपले पिस्तोल चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास वपोनि निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोउनि के. टी. गोडसे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com