
नाशिक । प्रतिनिधी
मुंबई च्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल तर्फे पक्षी सप्ताह निमित्त आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नेचर क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा यांना पक्षी या विषयात प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.
द्वितीय पारितोषिक योगेश दिवेकर,तृतीय पारितोषिक योगेश म्हात्रे,तर उत्तेजनार्थ पारितोषिक डॉ.मित शाह,श्रीकृष्ण जोशी,यांना मिळाले आहे.इस्त्रायलचा राष्ट्रीय पक्षी हुदहुदच्या छायाचित्रास पारितोषिक मिळाले.
या पक्ष्याच्या नावाने हुदहुद चक्रीवादळाचे नाव देखील देण्यात आले होते.बोरा यांनी या पक्ष्याचे दोन महिने अभ्यास करून जीवन चक्र देखील कॅमेरामध्ये कैद केले आहे.पिल्ले झाल्या नंतर नर हा खाद्य आणून चोचीने मादी कडे देतो तो दुर्मिळ क्षण प्रा.बोरा यांनी टिपला आहे. नंतर मादी पिल्लांना भरविते.