नाशिक | प्रतिनिधी

रंगपंचमीवर दुसऱ्या वर्षीही करोनाचे सावट आले आहे. यामुळे पंचवटीतील प्रसिद्ध रहाडी बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, कराेना संसंर्ग वाढत असल्याने शहर आणि जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांचे पालन हाेत आहे की, नाही हे पाहण्यासाठी पाेलीस दल सज्ज असणार आहे. तसेच निर्बंध असताना कुणी सार्वजनिक ठिकाणी रंगाेत्सव वा धिंगाणा घालणातील, त्यांच्या कठाेर कारवाई केली जाणार आहे.

आज(दि.२) रंगपंचमीच्या दिवशी पंचवटीत सार्वजनिक ठिकाणी व रहाडात रंग खेळण्यासाठी पोलीस प्रशासनाने मनाई केली आहे. दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा केला जातो. पंचवटीतील सरदार चौक व गाडगे महाराज पुलाजवळ दोन पेशवेकालीन रहाडी असून या रहाडात उड्या घेण्यासाठी नाशिक शहरातील हजारो रंगप्रेमी सहभागी होतात.

मात्र, करोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना लागू केल्या आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात येऊन गर्दी होणाऱ्या ठिकाणी थेट संचारबंदी लागू केली आहे. मागील वर्षीही कराेनामुळे रंगाेत्सव साजरा झाला नव्हता. तर आता दुसऱ्या वर्षीही कराेनाने डाेकेवर काढल्याने तमाम नाशिककरांना रंगपंचमीला मुकावे लागलले आहे.