एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्ववत करा; आम्ही नांदगावकर कृती समितीचे धरणे आंदोलन

एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्ववत करा; आम्ही नांदगावकर कृती समितीचे धरणे आंदोलन

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

येथील रेल्वेस्थानकावर (railway station) काशी (Kashi), महानगरी (Mahanagari), कामायनी (Kamayani), झेलम (Jhelum), कुषीनगर (Kushinagar) आदी एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे (Express trains) थांबे करोना (corona) प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले होते. त्यापैकी काशी व महानगरी एक्स्प्रेसचे थांबे (Express stop) रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) 14 ऑगस्टरोजी पुर्ववत सुरू केले.

उर्वरित गाड्यांचे थांबेही पुर्वरत सुरू करत पादचारी पुलाची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी येथील गांधी चौकात भरपावसात धरणे आंदोलन (agitation) करण्यात आले. करोना काळापासून आजतागायत नांदगाव रेल्वेस्थानकावरील (Nandgaon Railway Station) काशी, कामायनी, महानगरी, झेलम, कुषीनगर व इतर एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे (Stops of express trains) रेल्वे प्रशासनाने रद्दच ठेवले होते.

त्यामुळे नांदगावकरांसह तालुक्यातील व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी वर्गातर्फे रेल्वे प्रशासनाच्या धोरणाविरूध्द तीव्र असंतोष पसरला होता. नांदगाव रेल्वेस्थानकावर दैनंदिन प्रवास करणार्‍यांची संख्या अधिक आहे. आम्ही नांदगावकर कृती समितीने (Nandgaonkar Action Committee) रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी वेळोवेळी निवेदने (memorandum) देऊन आंदोलने करत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच शहरात बॅनर (banner) लावून थांब्यासाठीची मागणीही केली होती.

अखेर त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने काशी व महानगरी एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे (Stops of express trains) दि. 14 ऑगस्टरोजी पुर्ववत सुरू केले. कामायनी, झेलम, कुशीनगर व इतर रेल्वेगाड्यांचे थांबे मात्र अद्याप पुर्ववत सुरू करण्यात आले नाहीत. सदर रेल्वेगाड्यांचे थांबेही पुर्ववत करण्यासह पादचारीपूल निर्मितीच्या मागणीसाठी आम्ही नांदगावकर कृती समितीने गांधी चौकात भरपावसात तीन तास धरणे केले. आंदोलनात नांदगावकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com