रेल्वे थांबे पूर्ववत करा: खा. पवार

रेल्वे थांबे पूर्ववत करा: खा. पवार

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) निफाड (niphad), नांदगाव (nandgaon), लासलगाव (lasalgaon), मनमाड (manmad) सह परिसरातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय (Inconvenience to railway passengers) लक्षात घेता रेल्वे थांबे (train stops) पूर्ववत करावे या मागणीसाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री .डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी दिल्ली (delhi) येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

याप्रसंगी नांदगाव, मनमाड व लासलगाव येथील करोना (corona) काळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करण्याबाबत आग्रही मागणी केली. यामध्ये कोविड काळात कमी करण्यात आलेले कामयानी एक्सप्रेस (Kamayani Express) (11071 व 11072) चे लासलगाव व नांदगाव येथील थांबा पुन्हा सुरू करावे. लासलगाव येथून मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवासी नाशिक (nashik) तसेच मुंबई (mumbai) उपनगरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने प्रवास करतात.

या मार्गावर गाड्यांची उपलब्धता अतिशय कमी असल्याने परिसरातील प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे व लोकमान्य टिळक टर्मिनल (Lokmanya Tilak Terminal) ते मनमाड जंक्शन (Manmad Junction) दरम्यान धावणारी गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस (Godavari Superfast Express) (12117) व (12118) पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी. नांदगाव, इगतपुरी, नांदगावसाठी रेल्वे थांबे तत्काळ निर्गमित करणे संदर्भात ना.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव याचे सोबत सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामुळे आता वरील रेल्वे स्थानकांना रेल्वे थांबे मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com