रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद

रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad Nashik ) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने पंचायत समितीच्या आवारात आयोजित करण्यात येणार्‍या रानभाज्या महोत्सवास ( wild vegetable festival)पुन्हा नाशिककरांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. 61 बचत गटांनी महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवात एक लाखापर्यतची उलाढाल झाली.

या विक्रीतून बचत गटांना उत्पन प्राप्त होत आहे.या शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देऊन बचत गटांमार्फत विकल्या जाणार्‍या रानभाज्या व इतर वस्तुंची माहिती घेत बचत गटांना आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले.

गेल्या तीन वर्षापासून नाशिक पंचायत समितीच्या आवारात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांंना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उद्देशाने उमेद अभियानामार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दर शुक्रवारी 10 ते 2 या वेळेत नाशिककरांसाठी रानभाज्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.आदिवासी बांधवांना व महिला गटांना आपल्या वस्तु विक्रीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तीन महिने चालणार्‍या या महोत्सवात रानभाज्यांबरोबर बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तुही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

या महोत्सवात प्रत्येक तालुकयातील बचत गटांना सहभागी करुन घेण्यात येत आहे. या आठवडयासाठी 55 बचत गटांनी रानभाज्या महोत्सवाकडे नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात आज 61 गटांनी सहभाग नोंदविला.यामध्ये रानभाज्या विक्रीसाठी आणलेले 33 गट, जेवणासाठीचे 4 गट व इतर वस्तु घेऊन आलेल्या 24 गटांचा समावेश होता.आज पाऊस असतानाही नाशिककरांनी रानभाज्या खरेदीसाठी गर्दी केली. रानभाज्या तसेच विविध वस्तुंच्या विक्रीतून एक लाख चार हजार 480 रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com