गोल्फ स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

गोल्फ स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रिव्हर साईड गोल्फ कोर्स (Riverside Golf Course ) नाशिक जिल्हा गोल्फ असोसिएशन (Nashik District Golf Association )आणि वेस्टर्न इडिया गोल्फर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या निफाड ( Niphad )येथील रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथील गोल्फ कोर्सवर खुल्या गटाच्या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन वेस्टर्न इडिया गोल्फर्स असोसिएशनचे सचिव जांगो मिस्त्री, रिव्हर साईड गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत पुणे. मुंबई, देवळाली, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण ३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये चार महिलांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये सेंटर लाईन, निअरेस्ट टु द पॉइंट या प्रकारांचा समावेश होता.

निअरेस्ट टु सेंटर लाईन या प्रकारात चांगली चुरस दिसून आली. यामध्ये कर्नल शशीधरण यांनी सेंटर लाईनच्या सर्वात जवळ गोल्फचा बॉल मारून विजेतेपद पटकावले, तर कर्नल जे. एस. मंगत यांनी दुसरे स्थान मिळविले. तर एस. धरुवेन, कर्नल विनोद आणि कर्नल एस. पी. पॉल यांनी अनुक्रमे तीसरे, चवथे आणि पाचवे स्थान मिळविले.

निअरेस्ट टु द पॉइंट (होल) या प्रकारात कर्नल शर्मा यांनी उत्कृष्ट खेळ करून प्रथम पारितोषिक मिळविले. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळांबद्दल नाशिकच्या कबीर कालिया यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख आथिती डॉली मंगत, विंग कमांडर प्रदीप बागमार, नितीन हिंगमिरे यांच्या हस्ते पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोल्फ असोसिएशन जिल्हा नाशिकचे सचिव नितीन हिंगमिरे यांनी केले. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आशीष केसरिया, राजन कोल्हे आणि त्यांच्या सहकारी यांनी परीश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com