सराफ व्यावसायिकांच्या बंदला प्रतिसाद
सराफ बाजार

सराफ व्यावसायिकांच्या बंदला प्रतिसाद

नाशिक | Nashik

केंद्र सरकारच्या (Central Government) एचयुआयडी या कर प्रणालीला (HUID System) विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार व्यवसायिकांंनी आजच्या बंद मध्ये उत्स्फूर्त सहभागी होऊन नाशिकचा सराफ बाजार (Nashik Saraf Bajar) शंभर टक्के बंद ठेवला...

सराफ व्यावसायिकांनी आज एक दिवसीय बंंदची हाक दिल्याने साहजिकच लाखो रुपयांंची उलाढाल ठप्प झाली.

सराफ असोसिएशनचे (Saraf Association) अध्यक्ष गिरीश नवसे (Girish Navase) यांच्या मार्गदशानाखाली कशोर वानखेडे, मेहुल थोरात, प्रमोेद चोक सी, कृष्णा नागरे, योगेश दंडागव्हाळ आदींसह शेकडो सराफ व्यावसायिकांनी बंद यशस्वी केला.

एचयुआयडी प्रणालीला विरोध करण्यासाठी एक दिवसीय बंद पाळण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. सोन्याची शुध्दता व गुणवत्ता यासाठी हॉलमार्क कायदा आवश्यकच आहे, त्याचेेे आम्ही स्वागतही केलेे.

मात्र केंद्र सरकार पुन्हा एचयुआयडी प्रणाली आणून सऱाफ व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आणू पाहत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्याला सामान्य व्यावसायिकांंचा तीव्र विरोध आहे. या कायद्याने व्यावसाय करणे कठीण होईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com