श्रीगणेशमूर्ती संकलन केंद्राला प्रतिसाद

श्रीगणेशमूर्ती संकलन केंद्राला प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पर्यावरणपूरक गणेशोत्सव Ganesh Festival साजरा करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने ‘विघ्नहर्ता’ उपक्रम हाती घेतला आहे. गणेश विसर्जनामुळे होणारे नदीचे तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक मनपाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरात पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानिमित्त Ganesh Immerssion मनपाच्या आवाहनास प्रतिसाद देत तब्बल 3,541 नागरिकांनी त्यांच्या घरगुती गणेशाचे विसर्जन नदीपात्रात न करता मूर्ती मनपाच्या संकलन केंद्रांवर जमा केल्या.

नागरिकांच्या प्रतिसादामुळे मनपाच्या पर्यावरण संवर्धन मोहिमेला बळ मिळाले आहे. यावेळी सुमारे 5 टन निर्माल्य मनपा सेवकांनी संकलित केले. पीओपीच्या गणेशमूर्ती घरीच विसर्जन करण्यासाठी 750 किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप नागरिकांना करण्यात आले.

यापुढील 7 व 10 व्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करणार्‍या नागरिक व सार्वजनिक मंडळांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्या गणेशमूर्ती मनपाच्या संकलन केंद्रांवर जमा कराव्यात व पर्यावरण रक्षण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.