मरणोत्तर अवयव दान जनजागृती कार्यक्रमाला प्रतिसाद

25 जणांनी दिले नोंदणी पत्र
मरणोत्तर अवयव दान जनजागृती कार्यक्रमाला प्रतिसाद

सातपूर । प्रतिनिधी Satpur

स्वत: मरणोत्तर अवयव दानाचा (posthumous organ donation ) संकल्प करत इतरांनाही त्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी सातपूर येथील डॉ. अनिता बेंडाळे ( Dr. Anita Bendale ) यांनी अवयव दान जनजागृती कार्यक्रमांचे ( organ donation awareness programe) आयोजन केले होते. या कार्यक्रमात तब्बल 25 जणांनी नोंदणीपत्र भरून दिल्याची माहिती डॉ. बेंडाळे यांनी दिली.

अवयव दानाबाबत समाजात गैरसमज किंवा उदासीनता दिसून येते. याबाबत जनजागृती करण्यासाठी गणेशनगर, सातपूर येथील आत्मियता क्लिनिक येथे डॉ. भेंडाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नाशिकमधील अवयव दान चळवळीचे प्रणेते डॉ. संजय रकिबे यांनी अवयव दानाचे महत्त्व उपस्थिताना पटवून दिले.

त्यानंतर सुमारे 25 जणांनी अवयव दानासंबंधित नोंदणी पत्र भरून दिले. कार्यक्रमास डॉ. तेजु सुलेमान, डॉ. प्रियांका, डॉ. शीतल सुरजूसे, डॉ. स्मिता कांबळे, डॉ. उज्वल निकम, डॉ. ज्योती कोळसकर तसेच प्री. टी.यू. फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com